Loading...

चंदगड तालुका खरेदी विक्री संघ

खते,औषधे,बियाणे,घरगुती लागणारा माल शेतकऱ्यांना आपल्या तालुक्यात गावाजवळ मिळावा व होणारा वाहतुकीचा खर्च कमी होवून शेतकऱ्यांची सोय व्हावी व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने स्व.नरसिंगराव गुरुनाथ पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तालुक्यातील 28 सेवा संस्था व 1 व्यक्ती सभासदांनी रु 24200 (चौवीस हजार दोनशे रुपये फक्त) भागभांडवल जमा करुन चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना 28 डिंसेबर 1959 रोजी करणेत आली.

History

आपला देश शेतीप्रधानअसून देशातून देशाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिक उत्पादन घेणेसाठी आधुनिक पद्धतीने शेती करणे ,विज्ञान आणि संशोधन यांच्या आधारे शेती सुजलाम सुफलाम करणे व शेतीतून अधिक उत्पादन घेणे शेतकऱ्यामुळे आव्हान स्वीकारण्यासाठी कमी क्षेत्रात अधिक धान्य पिकवणे,कृषी उत्पादन वाढवणे करता शेतीसाठी उपयोगी अशी विविध प्रकारची खते,बियाणे,किटनाशखे, पशुखाद्ये,डिझेल—पेट्रोल,कडधान्य,जिवनापयोगी,कापड माल,प्रोव्हीजन माल तसेच शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या मालाची खरेदी करुन सहकार पद्धतीने बाजारात विक्री करुन विक्रीचे मालातूनशेतकरी व सभासदांना अधिक रक्कम मिळवून देवून शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे या उद्देशाने चंदगड तालक्याचे भाग्यविधाते व आमचे मार्गदर्शक,सहकार महर्षी माजी आमदार कै.नरसिंगराव गुरुनाथ पाटील यांच्या प्रयत्नातूनसंघाची स्थापना 28 डिसेंबर 1959 रोजी चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लि.तुर्केवाडी या नावाने स्थापना झाली. सुरुवातीस केवळ 14 सहकारी संस्था व 1 व्यक्ती सभासदांनी अवघे 24200/- रुपये या भागभांडवलावर ही संस्था स्थापन केली या इवल्याशा रोपट्यास वृक्षात रुपांतर करण्याचे कार्य संस्था चालकांनी केले आहे. सध्या सन 2023-24 मध्ये संस्था सभासद 211 व व्यक्ती सभासद 9306 असे एकुण 9517 सभासद असून भाग भांडवल रुपये 97.18 लाख आहे.