संस्था स्थापनेचा उद्देश असा की,चंदगड तालुका हा महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाला असलेल्या कोल्हापूर जिल्हयाच्या दक्षिण टोकाला मागासलेल्या भागात येतो त्यामुळे सदर तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास किंवा तालुक्यात बाजारपेठ नसलेने चंदगड पासून 40 ते 45 कि.मी अंतरावर गडहिंग्लज किंवा बेळगांव या ठिकाणी माल खरेदी अगर विक्रीसाठी जावे लागत होते. सदर तालुका हा अतिवृष्टीचा तालुका असलेने व दळणवळणाची सोय नसलेने बेळगांव किंवा गडहिंग्लज या बाजार पेठांशी सहा-सहा महिने संपर्क तुटत होता त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे हाल व त्रास होत असे,किंबहुना 6 महिन्याचा घरगुती बाजार किंवा खते,बियाणे,औषधे व जीवनापयोगी माल 6 महिने अधिच मिळेल त्या प्रतिचा मिळेल त्या दरात खरेदी करुन आणून ठेवावा लागत असलेने शेतकऱ्यांची भांडवली गुंतवणुक होत होती. तसेच कांही शेतकऱ्यांच्याकडे भांडवल उपलब्ध होऊ शकत नसलेने दलालाकडून 6 महिने अगोदर उत्पादित मालाचा करार करुन आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन घेऊन माल खरेदी करावा लागत होता व त्याची व्याजासह परतफेड उत्पादित मालातून करावी लागत होती त्यामुळे व्याजापोटी व मागेल त्या किंमतीला उत्पादीत माल दलालाकडे देवून शेतकरी भरडला जात होता याचा विचार करुन शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचा माल रास्त दरात व योग्य वेळी पुरवठा व्हावा व उत्पादित माल त्यांना सहकारी संस्थेमार्फत योग्य दरात विकता यावा व शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होवून त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या प्रामाणिक हेतूने ही संस्था स्थापन झाली आहे. सर्व प्रकारची रासायनिक खते,सेंद्रीय खते व जीवनापयोगी माल खरेदी करुन शेतकऱ्यांना योग्य दरात पुरवठा करणेचे संघाने चालविले आहे.तसेच शेतकऱ्यांना हव्या त्या पद्धतीची मिश्रखत तयार करुन देणेचे काम संस्थेने सुरु केलेले आहे.सुरवातीस संस्थेने 15x5x5 ग्रेडचे गायछाप मिश्रखते सुरु केले होते त्यानंतर 20x10x10 मध्ये रुपांतर झाले व त्यानंतर 18x18x10 गायछाप या ग्रेडचे खत उत्पादन करुन शेतकऱ्यांना योग्य दरात पुरवठा करणेचे काम सुरु आहे.सद्या संस्थेने स्वत:चे मालकीचा शिनोळी बु येथे 18x18x10 ग्रेडचे दाणेदार खत उत्पादन करणेचा कारखाना चालु केला असून त्यामार्फत योग्य प्रकारचे खत तयार करुन शेतकऱ्यांना योग्य त्या दरात वाटप करण्याचे कार्य सुरु आहे.
शेती उत्पादन वाढविणेचे दृष्टीने सभासद शेतकऱ्यांचे मागणीनुसार निरनिराळ्या ग्रेडची गायछाप दाणेदार, मिश्रखते,रासायनिक खते,इतर कंपन्याची विविध प्रकारची खते वेगगेगळ्या प्रकारची सेंद्रिय खते,पेंडी,तेले,किटकनाशके,बी-बियाणे,तननाशके,विद्राव्य खते,व शेती धंद्याशी निगडीत असा सर्व माल,तसेच कडधान्य़,जिवनापयोगी माल,पशुखाद्य,साखर,सर्व प्रकारचे मसाले,प्रोव्हीजन माल इत्यादी मालाचा तुळशी बझार मार्फत योग्य दरात पुरवठा करणे,शेतकरी संपर्क सभा-शिबीरे-मेळावे घेणे,ग्राहकांना खरेदी मालावर बक्षीस देणे,शेतकरी,संचालक व कर्मचारी शैक्षणिक सहली वगैरे उपक्रम हाती घेणे. शेतकरी ग्राहक याना आपल्या गावात माल मिळावा या हेतूने गांवागांवात शाखा उघडणे व सभासदांची सोय करणे,दूध संस्थाना पशू खाद्य पुरवठा करणे,शेतकऱ्यांचा उत्पादित माल संस्थेकडे आवक करुन तो माल योग्य दरात विक्री करुन देणे सहकाराचा प्रसार करुन सर्व सभासद,ग्राहक व शेतकरी यांना सहकारात आणून त्यांच्यामध्ये सहकार रुजवणे व अधिक अधिक लोकांना सहकाराचे महत्व पटवून देवून सहकारा मार्फत उन्नती करुन त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणे हा संस्थेचा प्रामुख्याने उद्देश आहे.
1. कोल्हापूर जिल्हा
2. बेळगाव बाजारपेठ असल्याने, बेळगाव येथे अडत दुकान
संघाचे शाखा व विभाग - संघाने चालविलेले 7 विभाग व 31 शाखा आहेत.
1. बेळगाव येथे अडत विभाग
2. दाणेदार खत कारखाना शिनोळी बु.
3. दौलत डिझेल व पेट्रोल पंप हलकर्णी
4. धान्यमाल पुरवठा विभाग हलकर्णी
5. खताचा पुरवठा करण्यासाठी खत विभाग यशवंतनगर
6. वाहतूक विभाग
7. शेतकऱ्यांच्या उत्पादीत माल खरेदीसाठी भात खरेदी विभाग
| 1) अडकूर,ता.चंदगड | 2) चंदगड,ता.चंदगड | 3) ढोलगरवाडी,ता.चंदगड |
| 4) कुदनुर,ता.चंदगड | 5) दाटे,ता.चंदगड | 6) हलकर्णी,ता.चंदगड |
| 7) हेरे,ता.चंदगड | 8)कोवाड,ता.चंदगड | 9)कानुरखुर्द,ता.चंदगड |
| 10)कुरणी,ता.चंदगड | 11)हलकर्णीफाटा,ता.चंदगड | 12) कालकुंद्री,ता.चंदगड |
| 13) कागणी,ता.चंदगड | 14) माणगांव,ता.चंदगड | 15) म्हाळेवाडी,ता.चंदगड |
| 16) मलतवाडी,ता.चंदगड | 17) नागणवाडी,ता.चंदगड | 18) निट्टुर,ता.चंदगड |
| 19) पाटणे ,ता.चंदगड | 20) पाटणेफाटा,ता.चंदगड | 21) राजगोळी बु,ता.चंदगड |
| 22) इब्राहिमपूर ,ता.चंदगड | 23) शिनोळीखु,ता.चंदगड | 24) सुरुते,ता.चंदगड |
| 25) तुडीये,ता.चंदगड | 26) गुडेवाडी,ता.चंदगड | 27) होसुर,ता.चंदगड |
| 28) तुर्केवाडी,ता.चंदगड | 29) यशवंतनगर,ता.चंदगड | 30) नेसरी,ता.गडहिंग्लज |
| 31) सांबरे,ता.गडहिंग्लज |
मार्केटमध्ये बेळगाव येथे संस्थेचे अडत दुकान असून या शाखेमार्फत सभासदांच्या शेती उत्पादीत मालाची विक्री केली जाते.सदर शाखेमार्फत गूळ, रताळी,बटाटे,यांची योग्य दरात विक्री करुन देण्याचे काम चालवले आहे.अहवाल सालात संघाकडे 5433पोती रताळी व 680 पोती बटाटे आवक होवून विक्री करणेत आलेले आहे.तसेचे कर्नाटक शासनाच्या यांचा गायछाप हातमिश्रखत उत्पादन परवाना क्रमांक 498 दि 20/08/2003 ने मिळालेला असून 17x17x17 या ग्रेडचे 375 में.टन खत उत्पादन करुन विक्री केले आहे सदरचे खत शेतकऱ्यांचे पसंतीस उतरले असून यामुळे संस्थेवर सभासद व ग्राहकांचा विश्वास संपादन झालेला आहे.
संस्थेने स्वतःचा गायछाप दाणेदार खत कारखाना शिनोळी बु. येथे उभारलेला असून सदर कारखान्यामार्फत उत्तम प्रतीची गायछाप १८x१८x१० दाणेदार मिश्रखते तयार करून शेतकरी व सभासदांना वाटप करण्यात येत आहेत. खताची गुणवत्ता चांगली असलेमुळे तालुक्यातून वाढती मागणी आहे.सन 2023-24 या हंगामात 6400 मेट्रिक टन दाणेदार खत उत्पादन करुन विक्री केलेली आहे तसेच चालू सालात7००० मेट्रिक टन दाणेदार खत उत्पादन करुन विक्रीकरणेचे उद्दिष्ट आहे.यावरुन संस्था सभासद व ग्राहक यांचा संस्थेशी खताबदल ची विश्वासर्हता वाढवली आहे.
सदर विभागमार्फत संस्थेच्या सभासदांना व ग्राहकांना योग्य प्रतीचे व योग्य मापात डिझेल-पेट्रोल पुरवठा केलेने ग्राहकांचा विश्वास वाढलेने मागील वर्षी डिझेल व पेट्रोल रुपये 22.82 कोटींची विक्री झाली होती त्यात रु 2.54 कोटींची वाढ होवून सन 2023-24 मध्ये 25.48 रु कोटींची विक्री झालेली आहे.चालू सालात कर्नाटक राज्यातील डिझेल व पेट्रोलचे दर महाराष्ट्र राज्यापेक्षा 6 रुपयाने कमी असून सुद्धा डिझेल व पेट्रोल विक्रीत रु 2.54 कोटींची वाढ झाल्याने संस्थेने ग्राहक व सभासदांचा विश्वास संपादन केला आहे.हे दिसून येते.
सभासदांना ग्राहकपयोगी माल,उत्तम प्रतीचा,अचूक वजन,स्वच्छ व निर्भिळ माल रास्त दरात उपलब्ध व्हावा या उद्देशाने शहरातील मोठमोठ्या बाजाराच्या (डी मार्ट) च्या धरतीवर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना व ग्राहकांना याचा लाभ व्हावा म्हणून संस्थेने प्रत्येक शाखेत तुलसी बाजार या नावाने मिनी बाजार चालू केले आहेत. त्यामध्ये शेतकरी व ग्राहक यांनी आपले पसंतीनुसार योग्य माल आपल्या मर्जीनुसार घेवून बारकोड स्टीकर प्रमाणे मालाच्या किंमतीचे पैसे देता येतात.त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत नाही त्यासाठी त्या शाखेकडील तुलसी बाजाराला माल पुरवठा करण्यासाठी तो माल स्वच्छ करून त्याचे योग्य वजनाचे पॅकींग करुन त्यावर विक्री दराचे बारकोड स्टीकर लावून शाखेकडे पाठविणेसाठी या विभागामार्फत सोय केलेली आहे.अशा व्यवहारामुळे ग्राहकांचा संस्थेवरील विश्वास वाढला असून मागील सन 2022-2023 मध्ये रुपये 17.63 कोटींची विक्री झाली होती त्यात वाढ होवून सन 2023-24 सालाची ग्राहकोपयोगी मालाची विक्री 19.80 कोटी झालेली आहे.चालू वर्षी सन 2024-25 मध्ये रुपये 23.64कोटींची विक्री झालेली आहे.यावरुन संस्थेच्या सभासद व ग्राहकांचा संस्थेवरील विश्वास दृढ झाल्याचे दिसून येते.
सदर विभागामार्फत युरिया,पोटॅश,सु.फॉस्पेट,डी.ए.पी.समर्थ,इफको 12x32x16 सुफला 15x15x15,संपूर्णा19x19x19,महाधन 23x23x0, अमोनियम सल्फेट,जीवानू खते इ.सर्व प्रकारची रासायानिक व इतर दाणेदार खते,सेंद्रीय खते योग्य दरात खरेदी करुनसंस्था शाखा व सभासदांना पुरवठा केली जातात त्यामुळे सदर विभागामार्फत मागील वर्षी रु 22.55 कोटीची खताची विक्री झाली होती.सन 2023-24 मध्ये रु.21.66 कोटीची इतकी विक्री झाली असून रु.0.89 लाखाने विक्रीत घट झाली आहे.यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झालेने शेतकऱ्यांने खत वापरायचे प्रमाण कमी केले आहे.त्यामुळे विक्रीत घट झाली असली तरी सुद्धासंस्थेने ग्राहकांचा व सभासदांचा विश्वास संपादन केला असलेमुळे चालु वर्षात 25.00 कोटींची खत विक्री अपेक्षित आहे..
संस्थेच्या सभासद व ग्राहकांना संस्थेमार्फत औषधे व बी-बियाणे विक्री करणेत आली असून मागील वर्षात 79.42 लाखांची विक्री करण्यात आली होती,ती सन 2023-24 मध्ये 72.88 लाखांची विक्री करणेत आली आहे. सन 2023-24 या वर्षात पावसाचे प्रमाण कमी असलेने विक्रीत अल्पशी घट झाली आहे. चालू सन 2024-25 या वर्षात 100.०० लाख विक्री अपेक्षित आहे.
1. इंडियन फार्मर्स फर्टीलायझर्स लि.
2. कृषक भारती को.ऑप.लि
3. झुआरी इंडस्ट्रिज लि.
4. राष्ट्रीय केमिकल्स अण्ड फर्टीलायझर्स लि.
5. इंडियन पोटॅश लि.
6. कोरोमेंडल इंटरनॅशनल लि.
7. महाराष्ट्र स्टेट को.ऑप.मार्केटींग फेड.लि
8. मंगलोर केमि.अन्ड पेट्रो केमि.
9. दीपक फर्टी.अन्ड पेट्रो केमि
10. नागार्जून फर्टी.अन्ड केमि
11. रामा कृषी रसायन लि
12. ग्रीनस्टार फर्टीलायझर्स
13. स्पीक फर्टीलायझर्स
14. पुष्कर केमिकल प्रा.लि
15. पारादीप फॉस्फेट फर्टीलायझर्स
16. क्रियाझेन अग्री बायोटेक लि.
संस्थेचे मुख्य कार्यालय व शाखा, विभाग यामधील अंतर ५० ते ६० कि.मी.असून तालुक्यातील शाखांना व संस्थांना तसेच शेतकऱ्यांना मागणी केलेला माल संस्थेपर्यंत व ग्राहकापर्यंत पोहोच करण्यासाठी संस्थेचा स्वतंत्र वाहतूक विभाग असून त्यामुळे सर्व शाखा व विभाग व ग्राहकांच्या मागणीप्रमाणे वेळेत खत, धान्य, तेले,रेशन माल, औषधे, सिमेंट, ग्राहकोपयोगी माल व इतर सर्व मालाचा पुरवठा करण्यासाठी तसेच कोल्हापूर,सांगली,मिरज व गोवा येथून माल आणण्यासाठी वाहतूक विभागाकडे १७ मेट्रिक टनाचे दोन ट्रक आहेत 10 मे.टन दोन ट्रक,5 मे.टन क्षमतेचा एक टेंपो,1.5 मे.टन क्षमतेचा एक टेंपो व मिरजहून डिझेल-पेट्रोल आणणेसाठी 12 हजार मे.टन क्षमतेचा एक टॅकर अशी एकुण 7 वाहने आहेत त्यामुळे संस्थेच्या शाखा व सभासद ग्राहक यांना माल पुरवठा करणे सोयीचे होते.
संस्थेने सभासदांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा या उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समिती तुर्केवाडी येथे भात,नाचना व अन्य शेती मालाची खरेदी चालू केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सदर मालाला अधिक भाव मिळणेस मदत झालेली आहे.हमीभाव धान्य खरेदीयोजनेअंतर्गत शासनाने राबवलेली हमीभाव धान्यमाल खरेदी योजना राबवून दरसाल 1000 ते 1500 टन भात खरेदी करुन तालुक्यातील शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देणेचे कार्य तालुका ख.वि.संघाने केलेले आहे व करीत आहे.